लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई: नालासोपारा येथे राहणाऱ्या १२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रत्युष सिंग असे या मुलाचे नाव आहे.
नालासोपारा पूर्वेच्या शिर्डीनगर येथे निलेश सिंग हे पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. शुक्रवारी दुपारी त्यांचा मोठा मुलगा प्रत्युष सिंग (१२) याने घरातील न्हाणीघरात असलेल्या स्टीलच्या पाईपला टॉवेल लावून त्याने गळफास घेतला. बराच वेळ प्रत्युषने दार न उघडल्याने त्याच्या पालकांनी दार तोडले असता हा प्रकार समोर आला.
आणखी वाचा-वसई: महामार्गावरील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी, बहिणीच्या वाढदिवसासाठी जात असताना दुचाकीचा अपघात
याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रत्युष हा सहावीत शिकत होता. त्याने आत्महत्येपूर्वी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नव्हती. त्याने नेमकी आत्महत्या का केली ते तपासात स्पष्ट होईल, अशी माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.