लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांनीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वसई पश्चिमेच्या गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर हा अपघात घडला. शाहीस्ता इमरान शहा (१४) असे या अपघात मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे.

वसई पश्चिमेच्या पापडी परिसरात राहणारी शाहिस्ता शहा उर्दू शाळेत इयत्ता नववीत शिकत होती. बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्या नंतर रस्त्यावरून जात असताना संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या समोर भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत शाहीस्ता ही गंभीर जखमी झाली. मात्र दुचाकीस्वार दुचाकी घटनास्थळी टाकून पसार झाला. रोहित जाधव असे या दुचाकीस्वाराचे निष्पन्न झाले असून वसई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आणखी वाचा-शहरबात… कौल दिलाय मग सुनावणी का?

याप्रकरणी वसई पोलिसांनी दुचाकीस्वाराची दुचाकी ताब्यात घेऊन दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी सांगितले आहे. या अपघाताच्या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 year old schoolgirl dies after being hit by speeding bike mrj