वसईत सुरू असलेल्या कला क्रीडा महोत्सवातील खो खो सामन्या दरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जण किरकोळ जखमी झाले. शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. जखमी खेळाडू आणि प्रेक्षकांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. बहुतांश जखमी महिला खेळाडू होत्या. हे सर्व विरार मधील चिखल डोंगरी आणि अर्नाळा गावातील होते.

वसई विरार महापालिका आणि वसई कला क्रीडा महोत्सवाच्या वतीने वसईच्या चिमाजी अप्पा मैदानावर ३४ वा कला क्रीडा महोत्सव सुरू आहे. शुक्रवारी या कला क्रीड महोत्सवाचा ४ था दिवस होता. मैदानावर विविध खेळांचे सामने रंगले होते. खो-खो सामन्याच्या वेळी उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीत दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते.

Shraddha Kapoor unveils the Express Group Screen magazine
दिमाखदार कार्यक्रमात ‘स्क्रीन’ पुन्हा वाचकांच्या भेटीला
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
kojagiri pornima is comming on 16th and 17th october
कोजागिरी! पोर्णिमेच्या रात्री सूपरमून दर्शन, असा आहे दुग्धशर्करा योग.
bharat gogawale, Shivsena Uddhav Thackeray faction,
आमदार भरत गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल करा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीची मागणी
Rashtriya Swayamsevak Sangh Marks 100 Years Dasara Melva 2024 Nagpur
RSS Marks 100 Years : भर पावसात झाले संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन
compromise between the producers and the censor board regarding the release of the emergency film mumbai news
‘इमर्जन्सी’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार; निर्माते- सेन्सॉर मंडळातील तडजोडीनंतर प्रकरण उच्च न्यायालयाकडून निकाली
PM Narendra Modi Thane, grand pavilion Ghodbunder,
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी, घोडबंदर भागातील मैदानात भव्य मंडपाची उभारणी
changes in traffic route due to inauguration of underground pune metro route
मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल, शिवाजीनगर-स्वारगेट भूमिगत मार्गिकेचे उद्या उद्घाटन

हेही वाचा >>> जूचंद्र उड्डाणपुलाच्या कामात निष्काळजी; खडतर पर्यायी रस्ते, धुळीचा त्रास, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

त्यामुळे साडेसातच्या सुमारास गॅलरी अचानक कोसळली. यामध्ये एकूण १५ जण जखमी झाले. त्यात खेळाडूंसह सामना बघण्यासाठी आलेल्यांचा समावेश होता. सर्व जखमींना वसई पारनाका येथील महापालिकेच्या सर डी.एम.पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व जखमीना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले.  या दुर्घटनेत कुणी गंभीर जखमी नव्हते. दोन जणांनी पोटात दुखत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यांच्या एक्सरे तपासणीत काही आढूळून आले नाही. सर्व रुग्णांना उपचार करून सोडण्यात आले, अशी माहिती सर डी.एम.पेटीट रुग्णालयाचे डॉक्टर असलम शेख यांनी दिली.

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर तसेच भाजपाचे नेते मनोज पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. खोखोचा सामना रंगतदार होता त्यामुळे उत्साहात क्षमतेपेक्षासमर्थक प्रेक्षक गॅलरीत चढले. त्यामुळे ही दुर्घटना घडली, असे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले. आजवर महोत्सवात अशी दुर्घटना कधी घडली नव्हती. परंतु यापुढे आम्ही आयोजनात अधिक काळजी घेऊ असेही शेट्टी यांनी सांगितले. दुर्घटनेंतर महोत्सवातील इतर सामने सुरळीत सुरू होते.