भाईंदर : मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

भाईंदर मतदारसंघातून एकूण २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यात बहुजन विकास आघाडीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या फ्रीडा मोराएस, अपक्ष उमेदवार एजाज खातिब, रमजान खत्री आणि भाजपमधून डमी अर्ज भरलेल्या सुमन मेहता यांचा समावेश आहे. यामुळे १७ उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील भुताळे यांनी दिली आहे.

Vasai Nalasopara Constituency, Vasai Nalasopara latest news, Vasai Nalasopara Constituency candidates,
वसई नालासोपारा मतदारसंघातून १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
nala sopara railway station
मराठीचा आग्रह करणाऱ्या प्रवाशाला डांबले, तिकीट तपासनीसाची दमदाटी
ECI on Hitendra Thakur Party Symbol Whistle in Marathi
Hitendra Thakur Party Symbol : हितेंद्र ठाकूर यांची ‘शिट्टी’ गायब !
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
On Saturday evening there was huge traffic jam problem in Nalasopara
सणासुदीला नालासोपाऱ्यात प्रचंड वाहतूक कोंडी

हेही वाचा – शिटी साठी बविआ ची उच्च न्यायालयात धाव

भाजपातील बंडखोरी शमली

मिरा भाईंदर विधानसभा भाजपने नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी रवी व्यास गटाचे समर्थक माजी नगरसेवक सुरेश खंडेलवाल व चंद्रकांत मोदी यांनी देखील बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र रविवारी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी व्यास यांची भेट घेऊन त्यांचे कान टोचले. परिणामी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी खंडेलवाल आणि मोदी यांनी आपले अर्ज मागे घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी स्वतः भाजप उमेदवार नरेंद्र मेहता उपस्थितीत होते. भाजपमधील बंड शमल्याने नरेंद्र मेहता यांना दिलासा मिळाला आहे. महायुतीतर्फे नरेंद्र मेहता, महाविकास आघाडीचे मुजफ्फर हुसेन आणि अपक्ष उभ्या असलेल्या गीता जैन यांच्यात खरी लढत रंगणार आहे.

गीता जैन यांना फलंदाज चिन्ह

महायुतीतर्फे ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या आमदार गीता जैन या पुन्हा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना फलंदाज (बॅटसमन) हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले आहे.

हेही वाचा – सणासुदीला नालासोपाऱ्यात प्रचंड वाहतूक कोंडी

गीता जैन या मिरा भाईंदरच्या विद्यमान आमदार आहेत. २०१९ मध्ये त्या अपक्ष निवडणूक जिंकल्या होत्या. सत्तांतरानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. यंदाही त्या निवडणूक लढविण्याची तयारी करत होत्या. खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना उमेदवारी मिळवून देण्याचे प्रयत्न करत होते. मात्र या जागेवर माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रबळपणे दावा केला होता. त्यामुळे जैन आणि मेहता यांच्यात रस्सीखेच सुरू होती. मात्र ऐनवेळी जैन यांना उमेदवारी नाकारून भाजपने ऐनवेळी मेहता यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या जैन यांनी अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली होती.

Story img Loader