वसई: विरार पूर्वेच्या कुंभारपाडा येथील तलावात पोहण्यासाठी उतरलेला २१ वर्षीय तरुण पाण्यात बुडाला. उद्धव महेश नाटेकर असे या तरुणाचे नाव आहे. सोमवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह आढळला. उद्धव नाटेकर हा तरुण विरार पश्चिमेच्या नारंगी बायपास येथील भागात आपल्या आई वडिलांच्या सोबत राहत आहे. रविवारी उद्धव हा आपल्या तीन मित्रांच्या सोबत कुंभारपाडा येथील तलावाच्या परिसरात पर्यटनासाठी आले होते. यावेळी उद्धव या तलावात पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच रविवार सायंकाळपासून शोधकार्य सुरू केले होते सोमवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह आढळला.
विरारमध्ये २१ वर्षीय तरुण तलावात बुडाला
वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच रविवार सायंकाळपासून शोधकार्य सुरू केले होते सोमवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह आढळला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 15-07-2024 at 22:23 IST | © The Indian Express (P) Ltd
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21 year old man drowned in a virar lake zws