वसई: विरार पूर्वेच्या कुंभारपाडा येथील तलावात पोहण्यासाठी उतरलेला २१ वर्षीय तरुण पाण्यात बुडाला.  उद्धव महेश नाटेकर असे या तरुणाचे नाव आहे. सोमवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह आढळला. उद्धव नाटेकर हा तरुण विरार पश्चिमेच्या नारंगी बायपास येथील भागात आपल्या आई वडिलांच्या सोबत राहत आहे. रविवारी उद्धव हा आपल्या तीन मित्रांच्या सोबत कुंभारपाडा येथील तलावाच्या परिसरात पर्यटनासाठी आले होते. यावेळी उद्धव या तलावात पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच रविवार सायंकाळपासून शोधकार्य सुरू केले होते सोमवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह आढळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा