वसई: नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर परिसरात टँकरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रिन्स मिश्रा (२३) असे तरुणाचे नाव आहे.मंगळवारी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. प्रिन्स मिश्रा हा विरार येथील सहकार नगर परिसरात राहत आहे.मंगळवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास दुचाकीने विरार स्टेशनकडे जात होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील टँकर चालकाने  बेदरकारपणे दुचाकीला धडक दिली. या धडकेत प्रिन्स याचा जागीच मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> वसई : बांधकाम ठेकेदाराच्या हत्येचा उलगडा; जुगाराच्या नादाने केली हत्या

अपघाताच्या घटनेनंतर टँकर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी तुळींजपोलीस ठाण्यात आरोपी टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.वसई विरार शहरात नियम धाब्यावर बसवून टॅंकर चालकांचा बेदरकारपणा सुरूच आहे. त्यामुळे सातत्याने अशा अपघाताच्या घटना समोर येत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. यापूर्वी तीन जणांचा टँकर अपघातात बळी गेला होता.

या पूर्वीच्या टँकर दुर्घटना

* २ एप्रिल २०२४ विरारच्या जकात नाका येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला टॅंकरने चिरडले यात महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. * १९ एप्रिल २०२४ विरारच्या ग्लोबल सिटी मध्ये टॅंकर मागे वळण घेताना आजी आणि नातू या दोघांचा मृत्यू झाला होता.