वसई : सिनेमात काम देतो असे सांगून एका २९ वर्षीय नवोदीत अभिनेत्रीवर निर्मात्याने वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात सिने निर्माता हरेश संघानी याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिनेमात अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन अनेक जण देशाच्या विविध भागातून मायानगरी मुंबईत येत असतात. सिनेमात काम मिळाल्यावर चंदेरी आयुष्याच्या झगमगाटात आयुष्य उजळून निघते. पण सिनेमात काम मिळणे एवढे सोप्पे नसते. त्यासाठी संघर्ष करायला लागतो. मुंबई आलेल्या तरुणींची मग अनेक जण फसवणूक करत असतात. तर काम देण्याच्या नावाखाली त्यांची लैंगिक अत्याचार केले जातात. या प्रकाराला कास्टींग काऊच असे म्हणतात. मिरा रोड येथील एका २९ वर्षीय तरुणीच्या बाबतीच असाच कास्टींग काऊचचा प्रकार घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार तरुणी मिरा रोड मध्ये राहून मुंबईच्या विविध प्रॉडक्शन कंपनीत काम शोधत होती. तिने मिरा रोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार जुलै २०२४ मध्ये तिला कास्टिंग कॉर्डीनेटर गुड्डू सिंग याने तिला सिनेनिर्माता हरेश संघांनी याचा नंबर दिला. त्यानुसर ती संघानी याला अंधेरी येतलील क्रिस्टल प्लाझा येथील कार्यालयात भेटल.ी जुलै २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात संघानी तिला मिरा रोड येथील घरी सोडण्यासाठी आपल्या गाडीतून घेऊन आला. महाार्गाच्या किनारी निर्जन जागेत त्याने गाडी थांबवली आणि तिचा विनयभंग केला. तिने विरोध केला असता सिनेमात काम करायचे असेल तर अशा गोष्टी कराव्या लागतील असे सांगितले.

३ महिने वारंवार बलात्कार

यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर २०२४ या काळात संघानी याने तिला अंधेरी येथील क्रिस्टल प्लाझा इमारतीमधील ६ मजल्यावरील कार्यालयात वारंवार बोलावले आणि सिनेमात काम देतो असे सांगून बलात्कार केला. सर्वांना असं करावं लागतं, तुला अभिनेता विवेक ओबेरॉय सोबत काम देतो असे आश्वासन त्याने दिले. बलात्कार करताना तो अनैसर्गिक कृत्य करत होता असेही पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यावेळी तो नकळत तिची अश्लील छायाचित्रे काढत होता, तसेच अश्लील चित्रफिती तयार करत होता.

अश्लील छायाचित्रांच्या आधारे धमकी

सुरवातील पीडित तरुणीने हा किळसवाणा अत्याचार सहन केला. मात्र संघानी याने तिला कुठल्याही सिनेमात काम दिले नाही. त्यामुळे तिची फसवणूक झाली होती. याबाबत विचारणा केली असता त्याने अश्लील छायाचित्रांच्या आधारे तिला धमकावले. अखेर तिने या अत्याचाराला कंटाळून मिरा रोड पोलीस ठाणे गाठले. मिरा रोड पोलिसांनी याप्रकरणी हरेश संघानी याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१), ६४ (२) ६९, ७४, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे, मेघना बुरांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिरा रोड