वसई: वसई विरार शहरात दिवाळी सणाचा जल्लोष सुरू असतानाच फटाके फोडताना व इतर कारणामुळे आगीच्या घटना घडल्या आहे. रविवारी शहरात एकाच दिवशी ३५ आग दुर्घटना घडल्या आहेत.दिवाळीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके फोडणे, विद्युत रोषणाई, दिव्यांची आरास केली जाते.मात्र काही वेळा घडलेल्या थोड्याशा चुकीमुळे आगी लागण्याच्या घटना घडतात.रविवारी लक्ष्मी पूजन असल्याने शहरात विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी सुरु होती. याच दरम्यान २४ ठिकाणी कचऱ्याला, ९ ठिकाणी झाडे, १ दुकान व एका वाहनाला अशा एकूण ३५ आग लागण्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

याशिवाय विरार पूर्वेच्या मनवेलपाडा रोडवरील धवलगिरी या इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील बंद घरात भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.या लागलेल्या आगीच्या घटनांवर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले.सुदैवाने या झालेल्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Story img Loader