सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई: वसई विरार शहरातील नालासोपारा शहरातील सांडपण्यावर प्रक्रिया करणारा ४३१ कोटी रुपयांचा सांडपाणी प्रकल्प नालासोपाऱ्यात उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १८३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी केंद्राकडून २५ टक्के तर राज्य शासनाकडून ४५ टक्के अनुदान मिळणार आहे.

वसई, विरार शहरात ७ सांडपाणी प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील सध्या विरारच्या बोळींज येथे (झोन १ आणि २) एकमेव सांडपाणी प्रकल्प सुरू आहे. त्यात दररोज ३० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. शहरातील उर्वरित सांडपाणी विनाप्रक्रिया समुद्रात सोडण्यात येत आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असते. होत असलेल्या प्रदूषणाच्या बाबत हरित लवादानेही पालिकेला दंड ठोठावला होता. त्यानंतर पालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या.

आणखी वाचा-रस्त्यावरील खड्ड्यांबाबत एक हजाराहून अधिक तक्रारी; वसई-विरार पालिकेकडून खड्डे बुजविण्यास सुरुवात

यामुळे पालिकेने पहिल्या टप्प्यात ३ सांडपाणी प्रकल्प प्रस्तावित केले आहेत त्यामध्ये नालासोपारा पश्चिम येथील गास मध्ये (झोन ४) वसईच्या नवघर माणिकपूर येथे (झोन ६) आणि नालासोपारा पूर्वेच्या आचोळे गाला नगर येथील (झोन ३) या प्रकल्पांचा समावेश होता. मात्र जागा आणि निधीची अडचण होती.नालासोपारा झोन ३ मधील सांडपाणी प्रकल्पासाठी योजनेचा प्रकल्प अहवाल, संकल्पने, आराखडे, नकाशे, अंदाजपत्रके महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केले आहे. केंद्र शासनाच्या अमृत २ योजनेअंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. त्याच्या निविदा मंगळवारी पालिकेने प्रसिध्द केल्या आहेत. हा संपूर्ण प्रकल्प ४३१ कोटी रुपयांचा असून तो दोन टप्प्यात केला जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील १८३ कोटी रुपयांची निविदा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आणखी वाचा-वसई : एकतर्फी प्रेमातून तरुणीला घरात घुसून मारहाण

असा असेल प्रकल्प

सांडपाणी प्रकल्प ३ हा नालासोपारा पूर्वेच्या आचोळे-गाला नगर येथे उभारण्यात येणार आहे. प्रकल्पातून दररोज १०३ दशलक्ष लिटर्स सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सोडले जाणार आहे. दोन वर्षांच्या कालावधी मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे नालासोपारा पूर्वेकडी सांडपाण्याची समस्या सुटून जलप्रदूषण कमी होणार असल्याचे पालिकेने सांगितले.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाअंतर्गत वसई विरार पालिका क्षेत्रातील भुयारी गटर योजना प्रकल्प राबविणयासाठी विविध व्यासांच्या मलजलवाहिन्या पुरवणे, अंथरवणे व कार्यान्विकत करण्यासाटई तसेच मालमत्तांच्या जोडण्यांच्या कामासह इथर आनुषंगिक कामे व रस्ता दुरूस्तीच्या कामासाी निविदा काढण्यात आली आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प पुर्ण करण्यात येईल. -राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई विरार महापालिका