लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई: राज्यातून भाजप आघडीचे ४५ खासदार निवडून येतील आणि पालघर मतदार संघातील भाजपचा खासदार राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. वसईत भाजपच्या घर चलो अभियानानंतर्गत बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सकारत्मक असून सर्व त्या मार्गाने प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सध्या भारतीय जनता पक्षाचे घर चलो अभियान सुरू आहे. या अभियाना अंतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी संध्याकाळी वसईचा दौरा केला. संध्याकाळी वसईच्या माणिकपूर येथील वायएमसीए सभागृहात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या मेळाव्यात नंतर त्यांनीं माध्यमांशी बोलताना भाजप आघाडीला येत्या लोकसभा निवडणुकीत ४५ जागा मिळतील असे सांगितले. याशिवाय पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राज्यातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी पक्ष सकारात्मक असून सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-वसईत मालगाडीचे दोन डब्बे रुळावरून घसरले

यावेळी बावनकुळे यांनी आनंद नगर बाजारातील दुकानदार आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. बहुतांश व्यापाऱ्यांनी २०२४ मध्ये नरेंद मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हायला हवेत, असे मत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, नालासोपारा विधानसभा संघटक राजन नाईक, वसई विधानसभा संघटक मनोज पाटील आदी यावेळी उपस्थित होते. यानिमित्ताने भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते.

Story img Loader