सुहास बिर्‍हाडे, लोकसत्ता

वसई- वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरातून दररोज ६ जण बेपत्ता होत आहेत. २०२३ मधील आकडेवारीनुसार ही बाब समोर आली आहे. मागील वर्षातील ११ महिन्यात २ हजार ४२ जणं बेपत्ता झाले होते. यापैकी ५१४ जणांचा शोध लागलेला नाही. बेपत्ता मुलांच्या शोधासाठी पोलीस उदासिन असल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले आहे

jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Rietesh Deshmukh
Riteish Deshmukh : “झापूक झुपूक वारं आलंय, गुलिगत धोका आहे”, धाकट्या बंधूसाठी थोरला बंधू प्रचाराच्या मैदानात!
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका

वसई विरार आणि मीरा रोड, भाईंदर शहरातून विविध कारणांमुळे लोकं घर सोडून जात असतात. त्यांचे प्रमाण वाढत आहे. २०२३ या वर्षात ( ३० नोव्हेंबर पर्यंत) २ हजार ४२ जणं बेपत्ता झाले होते. त्यामध्ये १ हजार १६२ महिला आणि ८८० पुरूषांचा समावेश आहे. यापैकी १ हजार ५२८ जण घरी परतले आहेत तर अद्यापही ५१४ जणांचा शोध लागलेला नाही. म्हणजेच दिवसाला सरासरी ६ जण बेपत्ता होत असतात. मात्र बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी पोलीस उदासिन असल्याचे अनेक प्रकरणात दिसून आले आहे.

आणखी वाचा-वसईतून ३ अल्पवयीन मुली बेपत्ता; दोन सख्या बहिणींचा समावेश

१८ वर्षाखालील अल्पवयीन मुलं बेपत्ता असल्यास अपहऱणाचा गुन्हा दाखल होतो. मात्र प्रौढ व्यक्ती बेपत्ता असल्यानंतर २४ तासांनी तशी नोंद केली जाते. परंतु अनेक प्रकरणात अशा बेपत्ता व्यक्तींच्या तपासाबाबत पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून आला आहे. नायगाव मध्ये राहणार्‍या नयना महंत (२८) ही तरूणी ९ ऑगस्टपासून बेपत्ता होती. मात्र पोलिसांनी वेळीच तपास केला नसल्याचा आरोप आहे. नंतर नयनाचा मृतदेह गुजराथच्या वलसाड येथे आढळून आला. परंतु तेव्हा तो बेवारस असल्याने गुजराथ पोलिसांनी त्याची विल्हेवाट लावली. नायगाव पोलिसांनी वेळीच तपास केला असता तर किमान माझ्या बहिणीचा मृतदेह तरी आम्हाला अंत्यसंस्कारासाठी मिळाला असता असा आरोप मयत नयनाची बहिण जया महंतने केला आहे.

२०२२ मध्ये श्रद्धा वालकर बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी २२ सप्टेंबर २०२२ मध्ये माणिकपूर पोलीस ठाण्यात केली होती. परंतू नंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्याची नोंद करण्यात आली. वसई पोलिसांनी तर तक्रार सुध्दा न घेता परत पाठवून दिले होते. या प्रकरणी मयत श्रध्दा वालकरच्या वडिलांनी पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल तक्रार केली होती. गृहविभागाने देखील या प्रकरणी चौकशीचे निर्दश दिले आहेत.

आणखी वाचा-अखेर सहाय्यक आयुक्त सचिन बच्छावच्या चौकशीसाठी समिती स्थापन

अल्पवयीन मुले बेपत्ता असल्यास अपहरणाचा गुन्हा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पवयीन मुले-मुले बेपत्ता असल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. यातील बहुतांश मुले-मुली प्रेमसंबंधातून घर सोडून गेलेली असतात. २०२२ या वर्षात ५०० मुले- मुली बेपत्ता झाली होती. २०२७ मध्ये तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांनी बेपत्ता मुलांच्या शोधासाठी तपास कसा कराया याबाबत ७२ कलमी नियमावली बनवली होती. त्यामुळे ८९ टक्के प्रकरणात मुला-मुलींचा वेळीच शोध लावता आला होता. परंतु या नियमावलीचे पालन होत असताना दिसत नाही.