वसई – वसई विरार शहरात वाहनांना आग लागण्याचे प्रकार वाढत आहे. बुधवारी मध्यरात्री वसईतील एका इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या ६ दुचाकींनी पेट घेतला. या आगीत सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. वाहनांना आग लागण्याची वसईतील ही मागील १५ दिवसांमधील दुसरी घटना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई पश्चिमेच्या शंभर फूटी रस्त्यावर न्यू सिद्धांत नावाची इमारत आहे. रहिवाशांनी इमारतीच्या आवारात दुचाकी उभ्या केल्या होत्या. बुधवारी मध्यरात्री अचानक दुचाकींनी पेट घेतला. यामुळे घाबरलेल्या रहिवशांनी त्वरीत अग्निशमन दलाला पाचारण केले. जवळच असलेल्या अग्निशमनदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत ६ दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. अज्ञात व्यक्तींनी आग लावली असावी अशी शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – वर्धा : आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन होणार २४ तासांत जमा, मिळणार ‘इतके’ कोटी रुपये

पोलिसांनी मात्र हा घातपात नसून दुर्घटना असल्याचे सांगितले. एका दुचाकीमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली आणि लगतच्या सर्व दुचाकींनी पेट घेतला असावा अशी शक्यता माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी व्यक्त केली.

पंधरा दिवसांतील दुसरी घटना

रविवार २ जुलैच्या पहाटे विरार पूर्वीच्या मनवेल पाडा येथील कमला चाळीत ३ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. ही आगदेखील दुचाकींमधील शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा – वाशीम : चक्क पंचायत समितीमध्येच भरली शाळा! शिक्षकांची पदे रिक्त, गोरगरीब विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

समाजकंटकाने आग लावल्याची शक्यता वाटत नाही. आम्ही सीसीटीव्ही पडताळणी करून तपास करत आहोत. एका दुचाकीने पेट घेतल्यानंतर लगतच्या अन्य दुचाकींना आग लागली आहे. – संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माणिकपूर