लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : नालासोपारा येथे ७ वर्षांच्या चिमुकलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अल्पवयीन आरोपी फरार झाला आहे. नालासोपार्‍याती सामूहिक लैंगिक अत्याचाराची महिन्याभराती ही ७ वी घटना आहे.

पीडित मुलगी ७ वर्षांची आहे. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास आरोपी शुभम वर्मा (३०) आणि १४ वर्षीय विधीसंघर्षित मुलाने तिला धानिवबाग येथील एका गल्लीतील गाळ्यात नेले. वर्मा याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला तर विधीसंघर्षित मुलाने त्या प्रसंगाचे आपल्या मोबाईल मध्ये चित्रण केले. हा प्रकार पीडित मुलीने घरी येऊन आपल्या आईला सांगितला. आईने तात्काळ पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आणखी वाचा- भाईंदर मधील लाईफलाईन रुग्णालयात गोंधळ, रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण

पेल्हार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधातल भारतीय न्या संहितेच्या कलम ६५ (२), ७७ तसेच बालकांचे लैगिक अत्याचापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आम्ही एका आऱोपीला अटक केली आहे तर दुसर्‍या फरार आरोपीचा शोध घेत आहोत, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.

सामूहिक लैंगिक अत्याचाराची ७ वी घटना

मागील महिन्याभरात नालासोपारा परिसरात सामूहिक लैंगिक अत्याचाराची ही ७ वी घटना आहे. यापैकी ४ गुन्हे आचोळे पोलीस ठाण्यात, २ गुन्हे तुळींज पोलीस ठाण्यात तर एक गुन्हा पेल्हार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 year old girl was sexually assaulted by two men in nalasopara mrj