वसई: वसई विरार शहराला सुर्या प्रकल्पातून अतिरिक्त १६५ दशलक्ष लिटर्स पाण्यापैकी ९० दशलक्ष लिटर्स पाणी मिळू लागल्याने नागिरकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र नवीन नळजोड्या देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना सध्यस्थितीत सुर्या प्रकल्पाचे दोन्ही टप्पे, तसेच पेल्हार आणि उसगाव या धरणांमधून एकूण २३० दशलक्ष पाणीपुरवठा होतो. सध्या महानगरपालिकेस दररोज १४० दशलक्ष लीटर पाण्याची तूट भासत आहे. शहरात पाण्याची समस्या सुटावी यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या सूर्या प्रादेशिक प्रकल्प ४०३ दशलक्ष लिटर्स पाण्याची योजना आहे. योजना १८५ दशलक्ष लिटर्सची असली तरी वसई विरार शहराला १६५ दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. दिवाळीपासून टप्प्या टप्प्याने हे पाणी वितरीत करण्यात येत आहे. सध्या वसई विरार शहराला यापैकील ९० दशलक्ष लिटर्स पाणी दररोज वितरीत करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. यासाठी वसई-विरार शहरात केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत १७ जलकुंभांचे काम हाती घेण्यात आलेले आहे.

हेही वाचा… दाट धुक्यामुळे रेल्वे रखडली

पाणी येऊ लागल्याने प्रलंबित नळजोडण्या देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मागील अडीच वर्षात पालिकेकडे २ हजार १०८ नवीन नळजोडण्यांचे अर्ज आले होते. त्यामुळे नळजोडण्यांच्या अर्जाची संख्या ४ हजार ९४५ एवढी झाली होती. मात्र पाणी टंचाई असल्याने पालिकेने नवीन नळजोडण्या देणे थांबवले होते. सुर्या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी आल्यानंतर या नळजोडण्या दिल्या जाणार असे पालिकेतर्फे सांगितले होते. परंतु अद्याप या नळजोडण्या देण्यात आलेल्या नाही. नळजोडण्या देणे हे धोरणात्मक निर्णय असल्याने सर्वांगिण विचार करून त्या दिल्या जातील असे पालिकेने स्पष्ट केले.

दरम्यान, पाणी पूर्ण क्षमतेने आलेले नाही त्यामुळे आताच नळजोडण्या देणे योग्य होणार नाही, असे मत माजी सभापती निलेश देशमुख यांनी व्यक्त केले. सर्व अनधिकृत नळजोडण्या आधी खंडित कराव्या आणि पाण्याती श्वेतपत्रिका काढावी मग नवीन नळजोड्यांचे नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 90 million liters of water under surya project to citizens of vasai virar but the process of giving new taps has not been started yet dvr
Show comments