लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई– अल्पवयीन मुलींवर जवळच्या लोकांकडून लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मिरा रोड येथे १२ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर इमारतीत काम करणार्या कचरावेचकाने लिफ्टमध्ये विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी ५८ वर्षीय आरोपी कचरावेचकाला अटक केली आहे.
पीडित मुलगी १२ वर्षांची असून ती मिरा रोड पूर्वेच्या काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. मंगळवारी दुपारी ती शिकवणी वर्गातून घरी परतली होती. लिफ्ट मधून वर जात असताना कचरा वेचक राजेंद्र तुसाबर (५८) हा लिफ्ट मध्ये शिरला आणि त्याने पीडित मुलीचा लिफ्टमध्ये विनयभंग केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी त्याने दिली होती. मात्र मुलीने घरी येऊन झालेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. तिच्या पालकांनी याप्रकऱणी काशिमिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार काशिमिरा पोलिसांनी आरोपी राजेंद्र तुसाबर याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कमल ७४ सह पोक्सोच्या कमल ८ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
हेही वाचा >>>मिरा भाईंदर शहरात आढळली ९ तीव्र कुपोषित बालके, संख्या १७ वर
चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचारांच्या घटनांध्ये वाढ
बदलापूर मधील शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांनंतर मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या प्रश्न ऐरणीवर आला होता. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या ८ महिन्यात विनयभंगाचे २७६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ७९ विनयभंगाचे गुन्हे अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्यातारासंदर्भात आहे. या प्रकरणात पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. छेडछाड करणे, पाठलाग करणे, अश्लील शिविगाळ करणे, अश्लील संदेश पाठवणे अशा प्रकरणातही इतर कलमांप्रमाणे विनयभंगाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. मागील महिन्यात नालासोपारा येथील शाळेतील अमित दुबे शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचे उघड झाले होते. विरार मध्ये खासगी कोचिंग क्लास चालविणार्या मोर्या नामक शिक्षकाने मुलींचा लैंगिक छळ केला होता. त्याला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते.