भाईंदर:- काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या नावे एक्स समाजमाध्यमावर बनावट पत्र प्रसारीत केल्याप्रकऱणी शिवसेना शिंदे गटाच्यान नेत्या शायना एनसी यांच्यावर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यापूर्वीच भाजपाच्या तीन जणांविरोधात गुन्हे दाखल आहेत. मुंबई बॉम्बस्फोट प्रकणातील याकूब कुरेशी याला फाशीच्या शिक्षेतून सवलत द्यावी यासाठी मुझफ्फर हुसेन यांनी स्वाक्षरी केलेले बनवाट पत्र समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यात आले होते.
मिरा भाईंदर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडी तर्फे मुझफ्फर हुसेन निवडणूक लढवत आहेत. या निवडणूकीत महायुतीचे नरेंद्र मेहता आणि अपक्ष उमेदवार गीता जैन रिंगणात आहेत. या प्रचारादरम्यान मुझफ्फर हुसेन यांच्या नावाचे एक बनावट पत्र समाजमाध्यमवर प्रसारीत करण्यात आले होते. मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी असलेल्या याकूब मेमेनला फाशीच्या शिक्षेतून सवलत द्यावी अशा आशयाच्या एका पत्रावर मुझफ्फर हुसेन यांनी स्वाक्षरी केली होती, असा आरोप भाजपाने केला होता. या संदर्भातील बनावट पत्र समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यात आले होते. याप्रकऱणी ५ नोव्हेंबर रोजी भाजप पदाधिकारी जेराम डिसुजा, कुणाल शुक्ला, गणेश मुर्गन आणि अन्य २० जणांवर मिरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा >>>‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
‘एक्स’ वर पत्र टाकल्याने शायना एनसी यांच्यावरही गुन्हा
शिवसेना (शिंदे गट) उमेदवा शायना एनसी यांनी देखील हुसेन यांची स्वाक्षरी असलेले बनावट पत्र ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमवार प्रसारीत केले होते. या प्रकरणात शायना एनसी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी मुझफ्फर हुसेन यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार त्यानुसार शायना एनसी वर देखील गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिरा रोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे यांनी दिली आहे.
माझ्या प्रचारसभांना सर्वत स्तरातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. माझ्यावर कुठलेही आरोप करता येत नसल्याने असे खोटे आरोप केले जात आहे. विरोधक वैफल्यग्रस्त झाल्याचे हे लक्षण आहे, असे मुझफ्फर हुसेन यांनी सांगितले.