वसई: मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पकडल्यानंतर रागाच्या भरात त्याने आपले दुचाकी जाळून टाकली. वसई पश्चिमेच्या सनसिटी येथे गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता ही घटना घडली. शिवकुमार नायर (३०) असे या तरुणाचे नाव असून त्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान त्याला पोलिसांनी अडवले होते. त्याने मद्यपान केल्याचे आढळून आले.

त्यानंतर पोलिसांनी त्याची दुचाकी जप्त केली आणि कागदपत्र घेऊन त्याला दुसऱ्या दिवशी बोलावले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास तो आला आणि पोलिसांशी वाद घातला. यावेळी अचानक त्याने आपले दुचाकी पेटवून दिली अशी माहिती वसई वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ निरीक्षक महेश शेटये यांनी दिली.

Story img Loader