वसई- नालासोपारा पूर्वेच्या तुळींज येथील मीरा दातार या २० वर्ष जुन्या निवासी इमारतीच्या दुसर्‍या मजल्याची गॅलरी कोसळली. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झालेली नाही. विशेष म्हणजे पालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून घोषीत करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नालासोपारा पूर्वेच्या तुळींज रोज येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे मीरा दातार ही दुमजली इमारच आहे. या इमारतीत ३० कुटुंबे राहतात. शुक्रवारी संध्याकाळी चारच्या सुमारास इमारतीच्या दुसर्‍या मजल्याची गॅलरी अचानक कोसळली. यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताची पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या दुर्गघटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही. ही इमारत २० वर्ष जुनी आहे. पालिकेने त्याला धोकादायक घोषीत करून दुरूस्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार इमारतीची दुरूस्ती सुूरू होती. पाऊस कोसळत असल्याने ही गॅलरी कोसळल्याचे रहिवाशांनी सांगितले.

इमारतीच्या मुूळ बांधकामाला धोका नाही. मात्र गॅलरीचे वाढीव बांधकाम होते. ते कोसळले असल्याची माहिती प्रभाग समिती ड चे माजी सभापती निलेश देशमुख यांनी दिली.

इमारत धोकादायक असून ती बी २ सी या श्रेणीत होती. त्यामुळे दुरूस्तीची आवश्यकता होती. इमारतीच्या रहिवाशांकडून दुरूस्तीचे काम सुरू होते. इमारतीचे संरचत्नातमक लेखापरिक्षण करण्यात येणार असून त्यानंतर रहिवाशाना अन्यत्र हलवायचे की नाही तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रभाग समिती ड (आचोळे) च्या प्रभारी सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांनी सांगितले.