वसई: विरार पूर्वेच्या चंदनसार येथील एच डी आय इल औद्योगिक वसाहतीत वर्टेक्स एज टेक या नेलपॉलिश बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. विरार पूर्वेच्या चंदनसार रोडवरील  एच डी आय एल औद्योगिक वसाहतीत वर्टेक्स एज टेक या नेलपॉलिश

तयार करणारा कारखाना आहे. शनिवारी सायंकाळी अचानकपणे आग लागली. या आगीची माहिती तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्याजवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. कारखाना बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  मात्र लागलेल्याआगीत कारखान्यात असलेला माल जळून खाक झाला आहे. यात कारखान्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साठा याशिवाय नेलपॉलिशसाठी लागणारे रंग आणि केमिकल असल्याने आगीने अधिक पेट घेतला असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.

Story img Loader