वसई पूर्वेच्या कामन देवदल येथे कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई पूर्वेच्या कामण चिंचोटी परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत. याच भागातील ममता कंपाउंड मध्ये प्रिंटिंग इंक कारखाना आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास युनिट १ व २ मधील गाळ्यामध्ये अचानकपणे आग लागल्याने खळबळ उडाली . याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच दोन अग्निशमन यंत्रणा वाहने घेऊन घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात येत आहे. कारखान्यात केमिकल युक्त पदार्थ असल्याने आगीचा भडका अधिकच झाला होता त्यामुळे काही वेळ आगीवर नियंत्रण मिळविण्यास अडचणी येत होत्या. एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून कुलिंग करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.

शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे.विशेषतः रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कारखाना बंद होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.