वसई: वसई पूर्वेच्या चिंचोटी येथे चप्पल तयार करण्याच्या कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

वसई पूर्वेच्या चिंचोटी नाका येथील कुरेशी कंपाउंडमध्ये चप्पल तयार करण्याचा कारखाना आहे. गुरुवारी सायंकाळी अचानकपणे या कारखान्यात आग लागल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हवेमुळे आगीचे लोळ हवेत उंच उंच पसरत असून आजूबाजूच्या गाळ्यात ही आग पसरली आहे. आगीची तीव्रता अधिक असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Success Story An inspiring journey from selling balloons
Success Story: रस्त्यांवर फुगे विकण्यापासून ते करोडोंची कंपनी उभी करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
man in pune entered house of elderly woman and tried to kill her
पुणे : धक्कादायक एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून जीवे मारण्याचा प्रयत्न, गजबलेल्या गणेश पेठेतील घटना; आरोपी अटकेत
CIDCO is in the process of giving land at a strategic location in Airoli sector to a large industrial group for the construction of a township
ऐरोलीतील मोक्याची जागा बड्या उद्याोगपतीला? टाऊनशिप उभारणीच्या नावाखाली ‘सिडको’चे अजब धोरण
Deonar, bio waste, Ambernath, Deonar Bio Waste Plant, Deonar Bio Waste Plant to Relocate to Ambernath, pollution,
मुंबईचा जैविक कचरा अंबरनाथमध्ये? जांभिवलीच्या औद्योगिक वसाहतीत भूखंड देण्याच्या हालचाली
Laborer murdered, Solapur, Laborer,
सोलापूर : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मजुराचा खून
pune youth buried after electrocuted
पुणे: जखमी तरूणाला उपचाराऐवजी खड्डयात गाडून पुरण्याचा प्रकार, सिंहगड रस्ता पोलिसांकडून दोघेजण ताब्यात

हेही वाचा – मेहता पिता पुत्रांच्या आत्महत्येचे गूढ कायम, कर्जबाजारी नसल्याचा सुनेचा दावा

हेही वाचा – वसईत दगड खाणीत डंपर कोसळला, अपघातात चालक व १४ वर्षीय बालकाचा मृत्यू

आग नेमकी कशामुळे कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. तर दुसरीकडे आगीच्या घटनेदरम्यान त्यात कोणी व्यक्ती अडकल्या आहेत का याचाही तपास सुरू आहे.