एका अल्पवयीन मुलीला विरारच्या अर्नाळा येथील लॉज मध्ये तब्बल १७ दिवस डांबून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने या मुलीची सुटका करून तिच्यावर बलात्कार करणार्‍या तिघांना अटक केली आहे.

पीडित मुलगी १५ वर्षांची असून ती वसईत राहते. तिची ओळख लक्ष्मण शेट्टी याच्यासोबत झाली होती. शेट्टीने तिला १ नोव्हेंबर रोजी विरारच्या अर्नाळा येथील सी साईट नावाच्या लॉजींग मध्ये फूस लावून आणले आणि तिला बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. यानंतर लक्ष्मण तेथून पसार झाला. या मुलीच्या असहायतेचा फायदा घेत लॉज चालक आकाश गुप्ता आणि कर्मचारी सुशांत पुजारी या दोघांनी देखील तिच्यावर बलात्कार केला आणि तिला कोंडून ठेवले. १७ दिवस ती या लॉजमध्ये अडकून पडली होती. शेवटी शुक्रवारी तिने अनैतिक मानवी वाहूतक प्रतिबंधक शाखेचे शाम शिंदे यांचा नंबर मिळवून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ या लॉजवर छापा टाकून तिची सुटका केली. या प्रकरणी तिच्यावर बलात्कार करणार्‍या आरोपींविरोधात बलात्कार, पोक्सो तसेच वेश्यागमनास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी दिली.

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
Vishal Gawli Sakshi Gawli the killers of a minor girl in Kalyan remanded in police custody till January 2 kalyan news
कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल, साक्षी गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
Story img Loader