वसई : विरार पूर्वेच्या महामार्गावरील खानिवडे उड्डाणपुलावर ट्रक व चारचाकी वाहनाची धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातात चारचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून गुरुवारी सकाळी स्कॉर्पिओ चारचाकी भरधाव वेगाने गुजरातच्या दिशेने जात होती. याच दरम्यान गाडीचा पुढील टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन मुंबई वाहिनीवर आली व समोरून येणाऱ्या आयवा ट्रकची जोरदार धडक बसली. यात आयवा ट्रकची जागेवर पलटी झाला.

हेही वाचा >>> वसई-विरारची तहान मार्चपासून भागणार, सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार

जोरदार धडकेमुळे चारचाकी वाहन पूर्ण चेपून गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.या घडलेल्या अपघातामुळे खडी ही रस्त्यावर सांडली होती त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. महामार्ग वाहतूक पोलीस व मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने क्रेन साहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Story img Loader