वसई- वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात २०२३ या वर्षात एकूण ३७ हत्या झाल्या. त्यापैकी ३६ हत्यांच्या उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. मात्र नालासोारा येथील महिलेच्या हत्याप्रकरणाचा अद्याप छडा लागलेला नाही. मागील ४ वर्षात शहरात एकूण १३५ हत्या झाल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२०२३ हे वर्ष वसई आणि भाईंदर मधील अनेक खळबळजनक हत्यांनी गाजले. शहरात २०२३ या वर्षात ३७ हत्यांचे गुन्हे दाखल झाले आहेत. २०२२ च्या तुलनेच हत्यांच्या प्रकरणात १ ने वाढ झाली आहे. त्यापैकी सर्वच्या गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिसांनी या हत्यांचा छडा लावला आहे. मात्र नालासोपारा येथील नगिनदास पाडा येथे शीतल सावंत (२९) या महिलेच्या हत्येचा छडा अद्याप लागला नाही. तिचा लिव्ह इन पार्टनर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा >>>वसई: इंधनाच्या गाड्या शहरात दाखल न होण्याच्या भीतीने पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या लागल्या रांगा
गाजलेल्या हत्या सरस्वती वैद्य हत्याकांड(जून २०२३ नया नगर पोलीस ठाणे)
मीरा रोड मध्ये राहणार्या मनोज साने या विकृत इसमाने तिची ‘लिव्ह इन पार्टनर’ सरस्वती वैद्य हिची हत्या करुन तिचा मृतदेह करवतीने कापला होता. त्यानंतर ते तुकडे कुकरमध्ये शिजवले होते.
चांदनी साह हत्या प्रकरण(१ डिसेंबर २०२३ पेल्हार पोलीस ठाणे)
वसई पूर्वेच्या वाण्याच्या पाडा येथे राहणार्या चांदनी साह या ८ वर्षीय मुलीची हत्या सरत्या वर्षाच्या शेवटी गाजली. १ डिसेंबर पासून ती बेपत्ता होती. दोन दिवसांनी तिचा मृतदेह जवळच्या चाळीतल एका रिकाम्या खोलीत आढळला होता. तिच्याच शेजारी राहणार्या अल्पवयीन मुलाने तिची हत्या केली होती. याप्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकऱणी मुलाच्या आई वडिलांनाही अटक करण्यात आली.
हेही वाचा >>>वसई : ट्रकचालकांनी महामार्ग रोखला, आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक
नयना महंत हत्या प्रकरण(ऑगस्ट २०२३- नायगाव पोलीस ठाणे)
नायगाव मधून एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या २९ वर्षीय नयना महंत या तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या केली. मृृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी प्रियकर मनोहर शुक्ला आणि त्याच्या पत्नीने सुटकेस मध्ये मृतदेह टाकून तो दुचाकीवरून गुजराथच्या वलसाड येथे नेऊन टाकला होता. यावेळी त्यांचा दोन वर्षांचा मुलगा देखील सोबत होता. नायगाव पोलिसानी पती-पत्नीला अटक केली
वसईतील लॉज मध्ये गायकाची हत्या(१७ सप्टेंबर २०२३ माणिकपूर पोलीस ठाणे)
वसईतील एका लॉज मध्ये उतरलेल्या हैदराबाद येथील गायकाची हत्या क्षुल्लक वादातून हत्या करण्यात आली. राधाकृष्ण व्यंकटरमन (५८) असे या हत्या झालेल्या गायकाचे नाव होते. याप्रकरणी लॉज मध्ये उतरलेल्या राजू शहा नावाच्या वाहन चालकाला माणिकपूर पोलिसांनी अटक केली