वसई : गणेशोत्सव काळातील विविध प्रदूषण टाळून समाजातील बंधुभाव वाढीला लागावा यासाठी यंदा वसई विरार महापालिकेने एक सोसायटी एक गणपती ही संकल्पना मांडली आहे. एकाच रहिवाशीं संकुलातील रहिवाशांनी आपल्या घरात स्वतंत्रपणे गणपती न आणता एकच मूर्ती आणून सामायिक गणेशोत्सव साजरा करावा अशी ही संकल्पना आहे. ज्या इमारती ही सामायिक गणेशोत्सवाची संकल्पना राबवतील त्यांना पालिकेकडून गौरविण्यात येणार आहे.वसई विरार महापालिकेने मागील वर्षांपासून नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या आधारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली आहे. कृत्रिम तलाव, मूर्ती दान, मूर्ती संकलन, निर्माल्यापासून खत निर्मिती करणे आदी प्रयोग यशस्वीपणे राबवले होते. यंदा पालिकेने ‘एक सोसायटी एक गणपती’ ही संकल्पना मांडली आहे. एक गाव एक गणपती या संकल्पनेच्याधर्तीवर हा प्रयोग राबविला जाणार आहे. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकार्याच्या सभेत ही संकल्पना मांडली.

संकल्पना कशी?

उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले की, विसर्जजनाच्या वेळी मिरवणुकीत वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण होते. हे प्रमाण कमी व्हावे आणि समाजात बंधुता टिकून रहावी यासाठी एक सोसायटी एक गणपती ही संकल्पना मांडली आहे. एका निवासी संकुलात अनेक जण घरगुती गणेशोत्सव साजरा करतात. परंतु तो प्रत्येकाने स्वतंत्रपणे साजरा न करता एकाच्याच घरी किंवा इमारतीच्या आवारात सार्वजिनक स्वरूपात करावा अशी ही संकल्पना आहे. यामुळे सणाचे पावित्र्य टिकून राहील, खर्चात कपात होईल आणि सर्व प्रकारचे प्रदूषण कमी होईल. ज्या ईमारती हा उपक्रम राबवतील त्यांना पालिकेतर्फे ५ हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

if congress in power will cancels adani contract
धारावी प्रकल्प रद्द करणार! काँग्रेसचा ‘मुंबईनामा’ जाहीर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप