वसई : गणेशोत्सव काळातील विविध प्रदूषण टाळून समाजातील बंधुभाव वाढीला लागावा यासाठी यंदा वसई विरार महापालिकेने एक सोसायटी एक गणपती ही संकल्पना मांडली आहे. एकाच रहिवाशीं संकुलातील रहिवाशांनी आपल्या घरात स्वतंत्रपणे गणपती न आणता एकच मूर्ती आणून सामायिक गणेशोत्सव साजरा करावा अशी ही संकल्पना आहे. ज्या इमारती ही सामायिक गणेशोत्सवाची संकल्पना राबवतील त्यांना पालिकेकडून गौरविण्यात येणार आहे.वसई विरार महापालिकेने मागील वर्षांपासून नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या आधारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली आहे. कृत्रिम तलाव, मूर्ती दान, मूर्ती संकलन, निर्माल्यापासून खत निर्मिती करणे आदी प्रयोग यशस्वीपणे राबवले होते. यंदा पालिकेने ‘एक सोसायटी एक गणपती’ ही संकल्पना मांडली आहे. एक गाव एक गणपती या संकल्पनेच्याधर्तीवर हा प्रयोग राबविला जाणार आहे. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकार्याच्या सभेत ही संकल्पना मांडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा