भाईंदर :– मिरा रोड येथे एका भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. मोहम्मद यार (२३) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मिरा रोडच्या नया नगर येथे मोहम्मद यार हा तरुण रस्त्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. याच परिसरात असलेल्या ऑर्चिड अपार्टमेंटजवळ तो मित्रांसोबत दुकानात राहत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा

हेही वाचा – वसई: नालासोपाऱ्यात १२१ नागरिकांचे गृहमतदान

मोहम्मद यार हा एक महिन्यांपूर्वीच उत्तरप्रदेशातून कामासाठी आला होता. शनिवारी रात्री सातच्या सुमारास इमारतीच्या सामूहिक शौचालयामध्ये त्याचा रक्तबंबाळ अवस्थेत असलेला मृतदेह आढळला. गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे. जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.