लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई- संचित रजा घेऊन फरार झालेल्या मुंबईतील अमली पदार्थ विक्रेत्याला मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने मीरा रोड येथून अटक केली आहे. तो तब्बल १२ वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता.

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Mumbai woman entered house in Malad and tried to rob 91 year old woman
डोळ्यात मिरचीपूड टाकून महिलेच्या लुटण्याचा प्रयत्न
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
fugitive gangster arrested , Lonavala , MPDA ,
‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार गुंडाला लोणावळ्यातून अटक
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी

२००७ मध्ये मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी शाखेने (नार्कोटीक्स कंट्रोस ब्युरो) नासिरअली खान (५२) या अमली पदार्थ विक्रेत्याला अटक केली होती. तो मुंबईच्या भायखळा येथे रहात होता. त्याच्यावर अमली पदार्था बाळगल्याप्रकरणी खटला सुरू होता. २०१० मध्ये त्याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर १० वर्षांची शिक्षा सुनवाण्यात आली आणि त्याची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान ११ फेब्रुवारी २०११ मध्ये त्याने संचित रजेसाठी (पॅरोल) अर्ज केला होता. त्याला ३० दिवसांची संचित रजा मंजूर झाली. मात्र तेव्हापासून तो फरार होता.

आणखी वाचा-वसई विरारला सुर्याचे पाणी तात्काळ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; आगरी सेनेच्या महिलांचे आमरण उपोषण ६ व्या दिवशी मागे

त्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला होता. परंतु तो आढळून आला नव्हत. दरम्यान मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र वितारे यांना हा आरोपी मीरा रोड येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तपास करून सापळा लावला आणि मीरा रोडच्या शीतल नगर येथून त्याला अटक केली. संचित रजेवरून फरार झाल्यानंतर त्याने आपली ओळख लपवली होती आणि पुन्हा अमली पदार्थाच्या व्यवहारात सक्रीय झाला होता. दरम्यान, त्याने दुसरे लग्नही केले होते.

पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुला राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक बेंद्रे, सरक, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader