वसई : जमिनीच्या प्रकरणात २० लाख रुपयांची लाच घेणाऱ्या मांडवीचा वनक्षेत्रपाल संदीप चौरे याच्या मिरा रोड येथील घरात एक कोटी ३७ लाखांची रोकड आणि ५८ तोळे सोने आढळून आले आहे. जमिनीच्या बाजूने निकाल देण्यासाठी मांडवी परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल संदीप चौरे याने २० लाखांची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्याविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याला पकडण्यासाठी सापळा लावला. मात्र तो फरार झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रात्री उशिरा ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या मिरा रोड येथील पूनम नगरमधील आसोपालव सोसायटीच्या घरात झडती घेतली. या इमारतीच्या डी विंगमध्ये चौरे याचे ६०१ आणि ६०२ अशा आलिशान दोन सदनिका आहेत. त्यात तो पत्नी आणि मुलांसह राहात होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रोख रकमेसह १ कोटी ३१ लाखांची रोकड आणि ५८ तोळे सोने जप्त केले आहे.या गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. चौरे याचे बीड जिल्ह्यातील खंडाळा येथे तसेच नवी मुंबई येथे घऱ आढळून आले आहे.

हेही वाचा >>> वसई : मांडवी वनक्षेत्रपालाने मागितली २० लाखांची लाच, सापळा फसला मात्र गुन्हा दाखल

याशिवाय त्याच्याकडे शासकीय अग्निशस्त्र (पिस्तूल) आणि ६ जिवंत काडतुसेदेखील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार यांच्या मालकीची ७ गुंठे जागा वसईतील सासूपाडा येथे आहे. २००७ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनविभागाने ही जागा ताब्यात घेऊन सील केली होती. हे प्रकरण मांडवी परिक्षेत्राकडे प्रलंबित होते. या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करून ती परत मिळवून देण्याचे आश्वासन मांडवी परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल एस. टी. चौरे याने दिले होते. त्यासाठी २० लाखांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या लाचेच्या रकमेचा १० लाखांचा हप्ता घेण्यासाठी स्वीकारण्यासाठी चौरे आणि त्याचा साथीदार असलेला खासगी इसम चंद्रकांत पाटील हे दोघे मंगळवारी दुपारी वसई पूर्वेतील एव्हरशाईन सिटीत आले होते. तेथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. मात्र त्याची कुणकुण लागताच चौरे पैसे न स्वीकारता निघून गेला. या प्रकरणात चौरे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने या दोघांविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.