वसई- १९९० मध्ये काशिमिरा येथे२२ वर्षीय तरुणाच्या झालेल्या हत्या प्रकऱणातील फरार आरोपीला पकडण्यात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा गुन्हे शाखा १ च्या पथकाला यश आले आहे. तब्बल ३४ वर्ष हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. जहांगिर शेख (६१) असे या आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंधेरीच्या मरोळ येथे राहणार्‍या मित्रांचा एक गट पार्टी करण्यासाठी काशिमिरा येथे आला होता. त्यावेळी गॅब्रीअल उर्फ सुधाकर अमन्ना (२२) याची ५ जणांनी मिळून हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी ५ आरोपींना हत्येच्या प्रकरणात अटक केली होती. मात्र ६ वा आरोपी जहांगिर शेख हा फरार होता. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणा दोषारोपत्र दाखल केले आणि नंतर प्रकरणाता तपास थंडावला होता.फरार आरोपी जहांगिर शेख हा मुंबईत रिक्षा चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखा १ चे पुष्पेंद्र थापा यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि त्यांच्या पथकाने शेख यालान ताब्यात घेऊन अटक केली.

हेही वाचा >>>टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम

पोलीस तपास थंडावल्याने आरोपी होता निर्धास्त

१९९० मध्ये आरोपी २५ ते ३० वर्ष वयोगटातील होती. पूर्ववैमन्यसातून ही हत्या करण्यात आली होती. आरोपी जहागिंर शेख आता ६१ वर्षांचा आहे. हत्येनंतर तो फरार झाला होता. अनेक वर्ष त्याने पोलिसांना चकमा दिला. नंतर तपास थंडावल्यानंतर तो पुन्हा मुंबईत आला. त्याने लग्न केले आणि मुंबईत राहू लागला होता. २०१४ मध्ये त्याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणात अटक देखील झाली होती. अचानक पोलीस पाहून त्याला धक्का बसला नंतर मात्र त्याने हत्येची कबुली दिली.