लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई: प्रदूषण पसरविणार्या महामार्गावरील सिमेंट कॉक्रीटच्या (आरएमसी) ४ प्रकल्पांवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र नगररचना अधिनियाच्या विविध कलमाअंतर्गत नायगाव पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालिकेच्या विशेष नियोजन प्राधिकऱणाने ही कारवाई केली आहे. गुन्हे दाखल असलेल्या प्रकल्पांमध्ये आरएमसी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, स्कायलॅण्ड आरएम ई इन्फ्रा, एमई इन्फ्रा आणि सुपर आऱएमसी बुल्डकॉन प्रा. लिमिटेड या ४ कंपन्यांचा समावेश आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुरू असलेल्या सिमेट कॉंक्रीटच्या आरएमसी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. या कारखान्यातून दररोज अवजड वाहने, मिक्सर तसेच वाळूची वाहने ये-जा करत असतात. प्रकल्पांकडून पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेच नियम पाळले जात नाहीत. तसेच प्रदूषण रोखण्याची कोणतीच यंत्रणा नसल्याने या कारखान्यातून सतत धुळीचे प्रदूषण होत असते. या वाढत्या धूळ आणि प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ढासळून नागरी आरोग्यावर ही याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. या प्रदूषणकारी प्रकल्पांची तपासणी करून त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. अशा प्रकल्पांच्या विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसा बजावल्या होत्या. वसई विरार महापालिकेने देखील आता या प्रकल्पांच्या विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे.
आणखी वाचा-वसई: १० वर्षीय मुलीचा तरणतलावात बुडून मृत्यू, रानगावच्या रॉयल रिसॉर्ट मधील घटना
महामार्गावरील मालजीपाडा गावात असेलल्या ९ पैकी ४ प्रकल्पांच्याविरोधात वसई विरार महापालिकेच्या विशेष नियोजन प्राधिकरण विभागाने अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२, ५३, ५४ अंतर्गत हे गुन्हे दाखल करणअयात आले आहेत. गुन्हे दाखल असलेल्या प्रकल्पांमध्ये आरएमसी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, स्कायलॅण्ड आर एम ई इन्फ्रा, एमई इन्फ्रा आणि सुपर आऱएमसी बुल्डकॉन प्रा. लिमिटेड या ४ कंपन्यांचा समावेश आहे.
२०१८ मध्ये या प्रकल्पांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलमाअंतर्गत नोटीस बाजावण्यात आल्या होत्या. मात्र तरी देखील त्यांनी कुठलेही कागदपत्रे न सादर केली नव्हती. पालिकेने केलेल्या तपासणीत प्रकल्पांचे बांधकाम अनधिकृत असल्याचे तसेच बेकायदेशीर पत्र्याचे शेड उभारल्याचे आढळून आले. त्यामुळे या ४ प्रकल्पांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती विशेष नियोजन प्राधिकरणाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांनी दिले. अन्य ५ प्रकल्पांविरोधात देखील निवडणूक संपल्यानंतर गुन्हे दाखल केले जातील अशीही माहिती संख्ये यांनी दिली.
आणखी वाचा-जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, मिरा रोडचा ढोंगी बाबा विनोद पंडितला अटक
या ४ प्रकल्पांविरोधात दाखल झाले गुन्हे
१) आरएमसी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड
मालक रतन सिंग
कुठे- मालजीपाडा सर्व्हे नंबर ५२, हिस्सा नंबर, १,२ ४
एकूण बांधकाम- ७२ हजार ४३६ चौरस फुट
२) स्कायलॅण्ड आर एम ई इन्फ्रा
मालक- मावाराम पटेल, नरेश नार आणि अन्य
कुठे- मालजीपाडा, सर्व्हे नंबर ४५/२ ५०/१
आरएमसी प्लांट चे अनधिकृत बांधकाम करून पत्र्याची शेड उभारली होती.
एकूण बांधकाम- ५८ हजार ४०० फूट
३)एमई इन्फ्रा
मालक- पियूष मेहता
कुठे- मालजीपाडा, सर्व्हे नंबर ५०, हिस्सा नंबर १
एकूण बांधकाम- ६१ हजार ८६४ चौरस फुटांचे बांधकाम
४) सुपर आऱएमसी बुल्डकॉन प्रा. लिमिटे
मालक-सुरेश देवासी
कुठे- मालजीपाडा, सर्व्हे नंबर ४५ /१, ५२/१,५२/४
एकूण बांधकाम- ३६ हजार ८६० फूट