दुरुस्ती परवानगीच्या नावाखाली बांधकाम केल्याचे उघडकीस

भाईंदर : मीरा रोड येथे दुरुस्ती परवानगीच्या नावावर चक्क तीन मजली अनधिकृत बांधकाम केलेल्या रुग्णालयावर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली आहे.

मीरा रोड येथील धरती कॉम्प्लेक्स परिसरात सिव्हर क्रिस्ट हे दोन मजली रुग्णालय तयार होत होते. या रुग्णालयाची वास्तू जुनी झाली असल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याकरिता पालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यात इमारतीचे प्लास्टर व डागडुजीचे काम करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र रुग्णालय मालकाने चक्क या ठिकाणी एक मजली अतिरिक्त बांधकाम करून तीन मजली बांधकाम केल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास

आली. त्यामुळे या बांधकामाला देण्यात आलेली दुरुस्ती परवानगी प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत यांनी रद्द केली. तर आयुक्त दिलीप ढोले यांच्या निदर्शनानुसार सोमवारी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. त्याच प्रकारे या बांधकाम व्यावसायिकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.