वसई: वसईत मुदत संपलेल्या ११ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. येत्या १६ ऑक्टोबरला या ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी ४७ केंद्रावर मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. वसईतील खानिवडे, शिरवली, मेढे, पोमण, शिवणसई, आडणे, उसगाव, माजीवली- देपीवली, चंद्रपाडा,  सकवार, भाताने  या  ग्रामपंचायतीसाठी  रविवारी निवडणूक पार पडणार आहे. यात ११ सरपंच व ११९ सदस्य अशा जागा आहेत. यातील ८ सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता सरपंच व सदस्य मिळून १२२ जगासाठी मतदान होणार आहे. यासाठी २९२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वसईतील ४७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी ४७  मतदान यंत्र (ईव्हीएम मशीन) सील बंद करून ठेवण्यात आल्या आहेत व २० मतदान यंत्रे ही राखीव ठेवली आहेत, तसेच या निवडणूक कामासाठी २७५ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मतपेटय़ा व कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी ७ चारचाकी वाहने व १५ बसेस अशी २२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याची  वसई तहसील विभागाने दिली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीचेही नियोजन करण्यात आले आहे.  प्रभागनिहाय   मतमोजणी केली जाणार आहे. सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त असेल.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २४ हजार मतदार

Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
Shailesh Vadnere Sangita Chendwankar murbad Assembly constituency MNS, Sharad Pawar NCP
उमेदवारांची आंदोलक, गुंतवणूकदारांना साद; बदलापूर अत्याचार, सागर इन्व्हेस्टमेंट प्रकरणातील संबंधितांना पाठिंब्यासाठी हाक
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
65 percent voter turnout recorded in first phase of jharkhand assembly polls
पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष

या ११ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ४२ प्रभाग असून सदस्य व सरपंच अशा १३० जागा आहेत. तर या सर्व ग्रामपंचायत मिळून मतदारांची संख्या ही २४ हजार ६६० मतदार आहेत. यामध्ये १२ हजार ७७८ पुरुष, ११ हजार ८८० महिला व इतर २ अशा मतदारांचा समावेश असल्याचे वसई निवडणूक विभागाने सांगितले आहे.

वसईतील ११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे. आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण झाली असून त्या त्या विभागात नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

-चंद्रकांत पवार, निवासी नायब तहसीलदार वसई