लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी वसईत प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी नियोजन केले आहे. याशिवाय पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट

वसई विधानसभा मतदारसंघात जी जी महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या विभागीय कार्यालयात शनिवारी सकाळी आठ वाजल्या पासून मतमोजणी प्रक्रियेला सुरवात होणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने २५० ते ३०० अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय १४ ठिकाणी टेबल लावण्यात आले आहेत. वसईत ३५४ मतदान केंद्र असून २५. ४ मतमोजणीच्या फेऱ्या पार पडणार आहेत. विरारच्या चिखलडोंगरे येथील मतपेट्यांपासून सुरुवात होऊन वसई पूर्वेच्या ससूनवघर येथील मतपेटीचा शेवट होणार आहे.

आणखी वाचा-नोटा वाटप प्रकरण : विवांता हॉटेलच्या मालकावरही गुन्हा दाखल

सुरुवातीला १ हजार २४९ टपाली मतांची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील २ लाख १८ हजार ५८ मतांची मोजणी केली जाणार आहे.प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक, सहायक कर्मचारी आदी मनुष्यबळाची नियुक्ती केली असल्याची माहिती वसई निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वसई मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मोजणीच्या ठिकाणी सुरक्षा, मत मोजणी नियोजन, त्यासाठी लागणारे साहित्य व अन्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. -डॉ. अविनाश कोष्टी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वसई.

मतपेट्यांच्या स्ट्रॉंग रूम जवळ कडेकोट बंदोबस्त

मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅट मशीन संबंधित मतदारसंघांच्या स्ट्राँग रुममध्ये अतिशय कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या रूमच्या जवळ सुरक्षेसाठी पोलीस दल, सीआरपीएफ तैनात ठेवले आहेत. सर्व मतपेट्या या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहेत. सकाळी या मोजणीच्या वेळी मत पेट्या बाहेर काढल्या जाणार आहेत.

आणखी वाचा-नालासोपारा मतदारसंघ संवेदनशील, चिखल डोंगरी मतमोजणी केंद्राच्या रस्त्यावर प्रवेश बंदी

मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी पोलीस प्रशासन ही सज्ज झाले आहे. वसईतील मतमोजणी केंद्रावर दीडशेहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, अंमलदार, सीआरपीएफ जवान असा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोपनीय पथक ही नियुक्त करून मतमोजणी केंद्र व त्याबाहेर विशेष लक्ष दिले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे नियोजन

वसई विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, महायुती आणि बहुजन विकास आघाडी यांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी करण्याची शक्यता आहे. अशा वेळी वादविवाद अन्य कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांशी बोलून त्याच्या कार्यकर्त्यांना थांबण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Story img Loader