भाईंदर :-मीरा रोड येथे शुल्लक वादातुन चार बालके आणि त्यांच्या आईची हत्या करून फरार झालेल्या दोन आरोपीना ३० वर्षांनंतर गुन्हे शाखे १ च्या पथकाने मधून अटक केली आहे. रामावध सरोज आणि त्याचा भाऊ सुनील उर्फ ​​संजय अशी या दोघांची नावे असून ते मांत्रिक म्हणून वावरत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेणकर पाडा येथील भरवड चाळीत राजनारायण प्रजापती हे पत्नी व चार मुलांसह रहात होते. आरोपी रामावध सरोज आणि संजय सरोज हे त्यांचे शेजारी होते. १९९४ मधून आरोपींच्या घरातून ३ हजार रुपयांची चोरी झाली होती. त्यामुळे प्रजापतीच्या मुलांवर त्यांना या चोरीचा संशय होता.त्याच कारणामुळे दोघात सतत भांडण होत होते.याचा राग मनात धरत एकेदिवशी आरोपीनी राज नारायणची पत्नी जानकी देवी (२५) आणि प्रमोद (५), पिंकी (४),चिंटू (२) तसेच दीड महिन्याच्या बाळाची चुकीने बोसकून हत्या केली होती.

हेही वाचा >>>‘आरोग्यवर्धिनी’चा ताप; दोन महिन्यांत १३०० केंद्रे उभारण्याचे राज्य सरकारकडून लक्ष्य

दरम्यान २०२१ मध्ये पोलिसांनी पुन्हा या गुन्हाचा तपास हाती घेतला. आरोपी हे मूळचे जौनपूर जिल्ह्यातील गौराबादशाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निशान गावचे रहिवासी होते.हत्येनंतर ते आपली नावे बदलून जौनपूर जिल्ह्यातील सोहनी या त्यांच्या मामाच्या गावी राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि वाराणसी पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई केली.या खुनाचा पहिला आरोपी सावलाला उर्फ ​​अमरनाथ चौहान याला ३० ऑक्टोबर २०२२ रोजी विमानतळावर अटक करण्यात आली होती.तर यातील मुख्य आरोपीचा शोध सुरूच होता.

दरम्यान हे दोघे जण मांत्रिक म्हणून काम करत आल्याचे पोलिसांना समजले.त्यामुळे खोटे ग्राहक बनवून पोलीसांनी आरोपीशी संपर्क साधला.यावेळी हेच ते आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचून आरोपीना वाराणसी येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 30 years two absconding after murdering 4 people were arrested bhayendar amy
Show comments