वसई– मिरा रोड येथे उसळलेल्या दंगलीनंतर शहरात सामाजिक सलोखा रहावा यासाठी पोलीस तसेच विविध सामाजिक संघटनांतर्फे प्रयत्न कऱण्यात येत आहेत. यासाठी शांतता बैठका, धार्मिक स्थळांना भेटी देऊन शांततेते आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, या शहराचे वातावरण कलुषित करणार्‍या दंगलखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहेत.

M,२२ जानेवारी रोजी मिरा रोड शहरात दंगल उसळली होती. त्यामुळे शहरात धार्मिक तणाव निर्माण झाला होता. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस, सामाजिक संघटना यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक पोलिसांकडून धार्मिक स्थळे, मशिदी आधी ठिकाणी भेटी सुरक्षिततेची हमी देण्यात येत आहे. दोन्ही समुदायातील लोकांच्या बैठका घेऊन शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश जनरल सेक्रेटरी डॉ. आसिफ शेख यांच्या नेतृत्वात मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित बुद्धिजीवी नागरिकांनी पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेतली. आगामी दोन महिन्यात येणारे सर्वधर्मिय सण व उत्सवाच्यावेळी पोलिसांनी आधीच खबरदारी काळजी घेऊन शहरात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवावा अशी मांगणी केली. दंगलखोरांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी यावेळी दिले.

ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत

हेही वाचा >>>वसई: पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या; जयंत बजबळे मुख्यालयात, प्रकाश गायकवाड परिमंडळ १ चे उपायुक्त

दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांप्रणाणे ददंगलीत ज्यांची दुकानांची तोडफोड करण्यात आली अशा पिडितांनी देखील  कटूभाव न ठेवता शहरात कायम शांतता रहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘माझ्या दुकानात येऊन अचानक काही तरुणांनी तोडफोड केली होती.यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.मात्र आता शहर शांत आहे. येथील बंधू भाव असाच कायम टिकून राहावा, अशी माझी इच्छा आहे, असे मिरा रोडच्या प्लेझंट पार्क येथील दुकानदार कन्हैय्या कनोजिया यांनी संगितले,माझा जन्मच या नया नगर भागात झाला आहे.त्यामुळे जन्मापासून माझे विविध धर्माचे मित्र आहे. हे शहर पुन्हा पहिले सारखे झाले आहे. यापुढे असे प्रकार घडू नये असेच आमचे प्रयत्न राहतील असे सैफ खान या तरुणाने सांगितले.

पोलिसांचे मानले आभार

मीरा भाईंदर शहरात मागच्या आठवड्यात दोन समुदायांमध्ये झालेल्या वाद-विवाद आणि संघर्षाने शहरातील शांती कायदा व सुव्यवस्थाची परिस्थिती गंभीर झाली होती. पोलिस प्रशासनाने अत्यंत कुशलतेने परिस्थिती हाताळली होती. याबाबत डॉक्टर आणि विविध प्रतिष्ठित नागरिकांनी तसेच मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आभार मानले. काशिमारी पोलीस ठाण्याचे वरीष्ट पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, नया नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे, जितेंद्र वनकोटी यांनी संयमाने परिस्थिती हाताळून दंगल वाढू दिली नाही. याबाबत त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Story img Loader