भाईंदर :- अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम उघडली आहे. भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्या ३ बांगलादेशी नागरिकांना मिरा रोड येथून अटक केली आहे. यात एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.
हेही वाचा – नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
हेही वाचा – समुद्रकिनारा पर्यटन धोक्यात, वसईत वाळू उपसा सुरूच; प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा मुख्य आरोपी हा मूळचा बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांकडून बेकायदेशीरपणे भारतात राहत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना पकडण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरात परराज्यातून आलेल्या संशयितांकडे कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. मिरा रोडच्या सिनेमॅक्स भागात तीन बांगलादेशी नागरिक काम करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ अधिकारी देविदास हांडोरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या तिघाजणांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे पारपत्र आणि व्हिजा नसल्याचे सिद्ध झाले. त्यांच्यावर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.