भाईंदर: मीरा रोड येथील शीतल नगर परिसरात असलेल्या हुतात्मा मैदानात फटाक्याचे दुकान सुरु करण्यात आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या फटाक्याच्या दुकानाविरोधात शहीद मेजर कौस्तुब राणे यांच्या पालकांनी ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे पालिकेने मध्यस्थी करत फटाक्याचे दुकान काढायचे आदेश दिले आहेत.
अवघ्या दोन दिवसावर दिवाळी उत्सव आला आहे. त्यामुळे शहरात जागोजागी फटाक्याची दुकाने उभारली जात आहेत. यंदा मोकळ्या मैदानातच फटाक्याच्या दुकानाना परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. अश्या परिस्थितीत मीरा रोड येथील शीतल नगर भागात असलेल्या सुविधा भूखंडावर फटाक्याचे दुकान उभारण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे हे दुकान येथून काढण्यात यावे म्हणून शहीद कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती राणे यांना ठिय्या आंदोलनावर बसण्याची वेळ आली आहे.
ज्योती राणे यांनी लोकसत्तेला दिलेल्या माहितीनुसार ”या सुविधा भूखंडावर गेल्या वर्षी आम्ही स्थानिक नागरिकांनी हुतात्मा मैदानाची निर्मिती केली आहे.यात देशासाठी हुतात्मे झालेल्या एकूण २३ शहिदांच्या नावे वृषरोपण केले आहे. शिवाय ही जागा लहान मुलांच्या खेळासाठी मोकळी सोडण्यात आली आहे. मात्र असे असताना देखील त्या ठिकाणी फटाक्याच्या दुकानांना परवानगी देणे हे चुकीचे आहे. पालिकेने हुतात्म्यांना महत्त्व द्यावे की व्यवसाय करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना हा त्यांचा विषय आहे. मात्र जो पर्यंत हे मैदान मोकळे होणार नाही तो पर्यंत आम्ही इथेच बसून राहणार आहोत. तर या संदर्भात पालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांस कडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, मोकळ्या जागेवर कागदपत्रे पूर्ण असल्यास फटाक्याचे दुकान टाकण्यास पालिकेकडून परवानगी दिली जात आहे. मात्र शितल नगर परिसरात नागरिकांचा विरोध होत असल्यामुळे तेथील दुकान तात्काळ काढण्याचे आदेश आम्ही दिले आहेत.याच शिवाय सुविधा भूखंडाची मालकी असलेल्या मालकाने आपल्या परवानगी शिवाय फटाक्याचे दुकान सुरू केले असल्याची तक्रार मिरा रोड पोलीस स्टेशनला पत्राद्वारे दिली आहे.