वसई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोमवारी होणार्‍या सभेसाठी वसईच्या सनसिटी येथे तयार करण्याच आलेल्या दफनभूमीची जागा बदलण्यात आली आहे. हे हेलिपॅड सर्वधर्मीय दफनभूमीत करण्यात येणार होते. मात्र त्याला मुस्लिम संघटनांनी विरोध केल्यानंतर त्याची जागा बदलण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी सोमवारी वसईत येत आहेत. वसई पश्चिमेच्या सनसिटी येथील मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. अमित शहा यांचे हेलिकॉप्टरने सभास्थळी आगमन होणार आहे. त्यासाठी पोलिसांनी सनसिटी येथी सर्वधर्मिय दफनभूमीच्या जागेत हेलिपॅड तयार करण्याचे काम सुरू केले होते. ही जागा ११ एकर एवढी प्रशस्त आहे.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा…पापडी तलावात पूल, पर्यावरणवाद्यांचा विरोध; पुलाचे सौंदर्य आणि क्षेत्रफळावर परिणाम होण्याची शक्यता

मात्र स्थानिकांनी विरोध केल्यानंतर दफनभूमीचे काम तांत्रिक मुद्द्यावर थांबवण्यात आले होते. या वादग्रस्त जागेवर हेलिपॅड तयार केले जात असल्याने मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या होत्या. या जागेवर यापूर्वीच मुस्लिम समाजातील व्यक्तीचे दफन करण्यात आल्याने ही जागा पवित्र मानली जाते, असे सांगून येथे हेलिपॅड तयार केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर पोलिसांनी या वादग्रस्त जागेवर हेलिपॅड उभारण्याचे काम रद्द करून जागा बदलली आहे. आता हेलिपॅड येथून जवळच असलेल्या टोकापाडा येथे तयार केले जात आहे, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली.

ही जागा सर्वधर्मीय दफनभूमीसाठी आरक्षित होती. त्याचे बहुतांश काम झाले होते. एका व्यक्तीचे दफन झाल्याने ही जागा आमच्यासाठी पवित्र मानली जाते. अशा ठिकाणी हेलिपॅड बांधणे चुकीचे होते. मात्र आता आमच्या विरोधानंतर पोलिसांनी हेलिपॅडची जागा बदलली आहे, अशी माहिती स्थानिक कार्यकर्ते फैजल कुरेशी यांनी दिली.

हेही वाचा…“आदित्य ठाकरेंच्या कपाळावर ‘मेरा बाप नपुंसक है’चा शिक्का”, नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य

अमित शहा यांच्या सभेची वेळही पुढे ढकलली

नियोजित कार्यक्रमानंतर अमित शहा यांच्या सभेची वेळ तिसर्‍यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. सुरुवातीला सभा सकाळी साडेअकरा वाजता होणार होती. नंतर मात्र ती दुपारी दीड वाजता करण्यात आली. रविवारी मात्र ही सभा संध्याकाळी सव्वाचार वाजता होणार आहे. सुधारीत कार्यक्रमानंतर अमित शहा यांचे दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे.

Story img Loader