भाईंदर :- मिरा रोड येथे तीन मजली इमारतीच्या गच्चीवरून पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.हमजा मुस्ताक कुरेशी असे मयत मुलाचे नाव आहे. मिरा रोडच्या पूजा नगर येथील सरयू अपार्टमेंट मध्ये मुस्ताक कुरेशी आपल्या पालकांबरोबर राहत होता. मंगळवारी सायंकाळी तो इमारतीच्या गच्चीवर खेळायला गेला असताना तोल जाऊन खाली पडला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
यावेळी त्याला उपचारासाठी मिरा रोडच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र डोक्याला जबरन मार लागल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी नरेंद्र कोरे यांनी दिली .
First published on: 08-02-2024 at 00:00 IST
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An 11 year old boy died after falling from the roof of a building amy