भाईंदर :– काशिमिरा परिसरात घरात एकटी असणार्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न तिच्या सतर्कतेमुळे टळला आहे. मुलीने आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी या आरोपी तरूणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
काशिमिरा परिसराती एक चाळीत १२ वर्षाची मुलगी एकटी घरात होती. तिचे आई वडिल कामावर गेले होते. ते पाहून २५ वर्षांचा तरुण तिच्या घरात शिरला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलीने मदतीसाठी धावा केला. ते ऐकून स्थानिकांनी तरूणाला पकडले आणि पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवले. काशिमिरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रसाद कनोजिया (२५) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधाक कलम ३५४ आणि लहान मुलावरील बाल लैगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे. तो याच परिसरात रहात असून फूड डिलिव्हरीचे काम करतो. यापूर्वी देखील त्याने काही मुलीची रस्त्यावरच छळ काढण्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी दिली आहे.