सिनेमात काम मिळवून देतो असे सांगून एका अभिनेत्रीचे ऑडीशनच्या नावाखाली अश्लील चित्रिकरण करण्यात आले. मात्र तिची दिशाभूल करून ते अश्लील बेवसिरीज मध्ये प्रसारीत करण्यात आले आहे. याप्रकऱणी ३ जणांविरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला आहे.

पीडित तरूणी १८ वर्षांची असून अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत आली आहे. सध्या ती वसईत भाड्याच्या घरात रहाते. हिंदी सिनेमा आणि बेवसिरीज मध्ये काम मिळविण्यासाठी ती विविध निर्मिती कंपन्यांकडे (प्रॉडक्शन हाऊस) भेटी देत होती. दरम्यान १ नोव्हेंबर रोजी तिला एका कंपनीतून दूरध्वनी आला होता. आम्ही नवीन बेवसिरीज तयार करत असून त्यासाठी मुलाखत (ऑडीशन) देण्यासाठी यावे लागेल असे या अभिनेत्रीला सांगण्यात आले. कामाच्या आशेपोटी ही तरूणी २ नोव्हेंबर रोजी तरूणी विरारच्या अर्नाळा समुद्रकिनार्‍यावर गेली होती. तिथे तिला या प्रॉडक्शन कंपनीचे ४ जण भेटले. त्यात एक दिग्दर्शनक, एक कॅमेरामन, एक अभिनेता तसेच एक महिला मेकअप आर्टीस्ट अशा चौघांचा समावेश होता.

Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार

हेही वाचा >>> वसई : अखेर राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला सुरवात, १२१ किलोमीटर रस्त्यावर व्हाईट टॉपिंग

चौघांनी तिला एका एका लॉज मध्ये ऑडीशनसाठी नेले. तिथे तिला काही दृश्ये चित्रित करायची आहेत असे सांगून तिला फसवून अश्लील दृश्य देण्यास भाग पाडले. ही दृ्श्ये केवळ ऑडीशनचा भाग असून तिचा कुठे वापर केला जात नांही. सिनेसृष्टीत असं कराव लागते असे तिला सांगितले. त्यामुळे या तरुणीचा नाईलाज झाला.

मात्र यानंतर तिला या कंपनीमधील कुणाचाच कॉल आला नव्हता. दरम्यान, तिची दृश्ये विविध अश्लील संकेतस्थळावर प्रसारीत केल्या जाणार्‍या अश्लील वेबसिरीज मध्ये टाकण्यात आल्याची माहिती तिला परिचितांकडून मिळाली. याबाबत तिने संबंधित लोकांना फोन केले. मात्र त्यांचे नंबर्स बंद होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनयिमाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखा ३ कडे वर्ग करण्यात आले आहे.

काही वर्षापूर्वी एक मोठा सेलिब्रिटी अशाच प्रकारे नवोदित अभिनेत्रींना फसवून त्यांची अश्लील चित्रफिती तयार केल्याच्या प्रकरणात गुंतल्याची मोठी चर्चा झाली होती. हा असाच प्रकार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील नवोदित तरुणींची फसवणूक करणारी टोळी कार्यरत आहे. या टोळीचे प्रॉडक्शन हाऊस देखील बनावट असून अनेक तरुणींची अशाप्रकारे फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Story img Loader