लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई: विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत न्यूझीलंड उपांत्यफेरिच्या सामन्यावर सट्टा लावणार्‍या एका सट्टेबाजाला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा एक साथीदार फरार आहे.

आणखी वाचा-वसई विरार शहरात फटाक्यांची बेकायदेशीर दुकाने

बुधवारी मुंबईत भारत आणि न्यूझीलंड दरम्यान एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उपांत्यफेरीचा सामना झाला. या सामन्यात मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी लावण्यात आली होती. असाच एक प्रकार भाईंदर मध्ये उघडकीस आला आहे. भाईंदर पुर्वेच्या साईबाबा नगर येथे हरिष तिवारी (४३) हा सामन्यावर सट्टेबाजी लावत होता. लोकांकडून पैसे घेऊन तो सट्टा लावत असताना आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर यापूर्वी सट्टेबाजीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात नवघर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) सह मुंबई टेलिग्राम ॲक्ट १९८७ च्या कलम २५(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा एक साथीदार फरार आहे.