Asian Taekwondo Championships वसई: बंगळू येथे सुरू असलेल्या १० व्या आशियाई तायक्वांडो स्पर्धेत वसईच्या विशाल सीगल यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे. या स्पर्धेत २२ देशातील ७०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
तायक्वांडो असोसिएशन ऑफ इंडिया आणि तायक्वांडो असोसिएशन ऑफ कर्नाटका यांच्या संयुक्त विदयमाने १० व्या आशियाई तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा भरविण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या पुरूषांच्या ४५ वर्ष वयोगटात वसईच्या विशाल सीगल यांनी सुवर्णपदक पटकावले. या विजयामुळे त्यांची पुढील वर्षी होणार्या जागतिक तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विशाल सीगल हे मिक्स मार्शल आर्टसचे प्रशिक्षक असून त्यांची कोई कॉम्बॅट ही राष्ट्रीय अकादमी आहे. सीगल यांनी यापूर्वी १४ वेळा राष्ट्रीय तायक्वांडो मिक्स मार्शल आर्ट स्पर्धा जिंकली आहे. मागील ४० वर्षांपासून ते मिक्स मार्शल मार्शल प्रकारात सक्रीय असून त्याचे प्रशिक्षण देत आहेत. ते भारताच्या मिक्स मार्शल आर्टचे माजी प्रशिक्षक देखील राहिले आहेत.