वसई: मागील चार ते पाच दिवसांपासून नायगाव-उमेळा फाटा रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे, परंतु हे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नायगाव पश्चिमेतून नायगाव स्थानक ते उमेळा फाटा हा रहदारीचा रस्ता आहे. मागील काही महिन्यांपासून त्याची अवस्था बिकट आहे. ठिकठिकाणी खडय़ांचे साम्राज्य आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी नागरिकांनी केली होती. भाजपाचे जिल्हा सचिव मुकुंद मुळय़े यांच्यातर्फे पत्रव्यवहारही करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने या आठशे मीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले. दिसायला रस्ता गुळगुळीत दिसत आहे, परंतु प्रत्यक्षात हे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे आहे. केवळ एकाच थराचे डांबरीकरण केले आहे. पावसाळा सुरू होताच ते पुन्हा उखडून रस्त्याची अवस्था बिकट होईल, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वसईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता अश्विनी भोसले याविषयी म्हणाल्या, रस्ते दुरुस्तीचे काम आवश्यकतेनुसार करण्यात येत आहे. जेथे कमी प्रमाणात रस्ता खराब आहे, तेथे एक थर आणि जिथे जास्त खराब आहे तिथे दोन थरांचे डांबरीकरण केले आहे.
नायगाव-उमेळा रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट
मागील चार ते पाच दिवसांपासून नायगाव-उमेळा फाटा रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे, परंतु हे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 13-05-2022 at 00:12 IST
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asphalting naigaon umela road degraded naigaon west naigaon station umela fork amy