वसई : पश्चिम रेल्वेवरील वसई, नालासोपारा, मिरा रोड ही रेल्वे सर्वात गर्दीची स्थानके बनत चालली असून येथे अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. २०२४ या वर्षात वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २२७ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यापैकी रुळ ओलांडताना १२८ जणांचा तर गर्दीमुळे ट्रेन मधून ५० जणांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिमे रेल्वेची वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अखत्यारित मिरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा अशा रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. वसई विरार मध्ये लोकसंख्या वाढत असल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दररोज लाखो प्रवासी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल ट्रेन मधून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. त्यामुळे मिरा रोड, भाईंदर, नालासोपारा, विरार ही स्थानके प्रचंड गर्दीची ठरू लागली आहेत. विरार बोरीवली दरम्यान चार मार्गिका तयार करण्यात आली असून लोकल ट्रेन गाड्यांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. मात्र सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून ट्रेनमधून लटकून प्रवास करावा लागत आहे. परिणामी ट्रेन मधून खाली पडून प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे.

Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
stampede at Sangam ghat on Mauni Amavasya in Prayagraj on Wednesday Maha kumbh Yogi Adityanath
Stampede Breaks Out at Maha Kumbh : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, तीस भाविकांचा मृत्यू
Jalgaon train accident marathi news
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठांचे पथक
Nepal citizens died , Jalgaon train accident, Jalgaon ,
जळगाव रेल्वे दुर्घटनेत नेपाळी नागरिकांचा मृत्यू
Jalgaon train accident 12 deaths
Jalgaon Train Accident : अफवेमुळे रुळावर उड्या, जळगावजवळच्या रेल्वे अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू
Jalgaon Railway Accident| Pushpak Pushpak Train Accident Latest Updates
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं
Tiger dead in train collision on Ballarsha-Chandrapur route
बल्लारशा-चंद्रपूर मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघ ठार

२०२४ या वर्षात वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५० प्रवाशांचा तर पालघरच्या हद्दीत २३ जणांचा ट्रेनमधून खाली पडून मृत्यू झाला होता. पालघर आणि वसईत एकूण ८३ प्रवाशांचा धावत्या ट्रेनमधून खाली पडून मृत्यू झाला होता. त्यात १० महिला आणि ६३ पुरूष प्रवाशांचा समावेश आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेेने दिली.

रुळ ओलांडताना वाढते मृत्यू

वसई आणि पालघर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे रुळ ओलांडना मृत्यू वाढत आहे. २०२४ या वर्षात २०४ प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला. त्यात वसईच्या हद्दीत १२८ तर पालघरच्या हद्दीत ७६ जणांचा मृत्यू झाला.मागील आठवड्यात पालघर रेल्वे स्थानकात वैष्णवी रावल (१६) या विद्यार्थिनीचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला होता.

रेल्वे रूळावर आत्महत्या

आत्महत्या करण्यासाठी धावत्या ट्रेनसमोर उडी मारण्याचे प्रमाणही वाढले. वसई रेल्वेच्या हद्दीत २३ जणांनी तर पालघरच्या हद्दीत २ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. मिरा रोड रेल्वे स्थानकात मेहता पिता पुत्रांनी केलेल्या आत्महत्या गाजली होती.

मृत्यूचे कारणवसईपालघर
रेल्वे रुळ ओलांडताना १२८ ७६
लोकल ट्रेन मधून पडून ५० २३
वीजेचा धक्का लागून
आत्महत्या २३ ३३
नैसर्गिक मृत्यू २३० २०

Story img Loader