विरार : वसई विरार महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या गाडीवर शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास एका आंदोलन कर्त्यांनी हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या आहेत. पोलिसांनी या आंदोलकर्त्याला ताब्यात घेतले आहे. सदरची गाडी पालिका मुख्यालयच्या खाली उभी असताना त्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

व्हिडिओ ::

वसई विरार महापालिका मुख्यालयच्या समोर अनधिकृत बांधकामच्या विरोधात एक इसम मागील दोन महिन्यापासून आंदोलन करत आहे. पण आपल्या आंदोलनाला पालिका आयुक्त कोणतेही उत्तर देत नसल्याने रागाच्या भरात या इसमाने मुख्यालयच्या खाली उभ्या असलेल्या गाडीच्या दगडाने काचा फोडल्या आहेत. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेऊन विरार पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Story img Loader