लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई: वसईत एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळावर पोहोचले मात्र पोलीस येत असल्याची कुणकूण लागताच आरोपी पसार झाले.

वसई पूर्वेच्या गोलानी नाका येथील दीप टॉवर इमारतीत शॉप नंबर १३ मध्ये एसबीआय बॅंकेचे एटीएम केंद्र आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास काही अज्ञात इसम एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत कंट्रोल रुमला स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर वालीव आणि नायगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळावर रवाना झाले. पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच चोरटे पसार झाले. अज्ञात चोरांनी एटीएमचे शटर बाहेरून बंद करून कटरच्या सहाय्याने एटीएम फोडत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मास्क लावलेला एक चोर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसत आहे. पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत.