भाईंदर : मद्यधुंद अवस्थेत एका रिक्षाचालकाने थेट मीरा रोड रेल्वे स्थानकात रिक्षा नेली. यावेळी उपस्थित नागरिकांच्या प्रसंगावधनामुळे रिक्षावर नियंत्रण मिळविण्यात यश आले, नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. रिक्षाचालकाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वसई समुद्रात बुडाले पिता-पुत्र; सेल्फी काढताना घडली दुर्घटना

ओणम सणानिमित्त नागरिक मीरा रोड रेल्वे स्थानकावर रांगोळी काढण्यासाठी जमा झाले होते. यावेळी मीरा रोड पूर्व भागाला लागून असलेल्या फलाट क्रमांक ४ वर एक रिक्षा येत असल्याचे त्यांना दिसून आली. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करत रिक्षाच्या दिशेने धाव घेतली. हे पाहताच रिक्षाचालकदेखील गोंधळून जाऊन तो पुन्हा बाहेरच्या दिशेने पळू लागला. यावेळी मिळेल त्या वाटेने जात असताना त्याला नागरिकांनी अडवले. यामुळे रिक्षा चालकाला आणि इतर प्रवाशांना होणारी दुखापत टळली. रिक्षा थांबताच रिक्षाचालकाला नागरिक जाब विचारण्यासाठी गेले असता तो मद्यधुंद अवस्थेत दिसून आला. रेल्वे पोलिसांनी रिक्षाचालकास ताब्यात घेतले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Autorickshaw enter mira road railway station premises zws